
21 ते 23 डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय धनूरविद्या स्पर्धेत जान्हवी पवार हिने 677 गुण घेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. ही राष्ट्रीय स्पर्धा 7 ते 9 जानेवारी 2025 ला जयपूर राजस्थान येथे होणार आहे. तसेच जान्हवीने 30मिटर मध्ये सुवर्णं पदक 20 मिटर मध्ये रजत पदक तर ओव्हरऑल सुवर्णं पदक जिंकले. शिवम झेंडे व जान्हवी यांनी मिक्स टीम प्रकारात सुवर्णं पदक जिंकले.तसेच अकॅडमी मधील प्रभू डोंगरे व पुष्कर पटवर्धन यांनी सांघिक रजत पदक जिंकले सर्व खेळाडूंचं अकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन