
3 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सीनियर आर्चरी स्पर्धेत गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडेमीच्या दोन आर्चरची सिनियर आर्चरी नॅशनल चॅम्पियनशिप साठी निवड झाली. वैष्णवी पवार हिने वयक्तिक ब्रॉन्झ मेडल तर 631 गुण घेऊन ओव्हरऑल ब्रॉन्झ पदक प्राप्त करून 3 क्रमांकावर राष्ट्रीय संघात नाव नोंदवले तर मुक्ता मोडगी हिने 631 गुण घेऊन चतुर्थ क्रमांकावर राष्ट्रीय संघात आपले नाव नोंदविले. राष्ट्रीय स्पर्धा ही 15 ते 20 डिसेंबर रोजी जमशेद्पुर झारखंड येथे होणार आहे. वैष्णवी व मुक्ता ही गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडेमी मध्ये प्रशिक्षक सुधीर पाटील, सुषमा पवार व मारोती बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तसेच वैष्णवी ला पुनीत बालन यांनी आर्थिक मदतीचा हात देऊन तीला तिच्या प्रशिक्षणात मोठा सहयोग दिला आहे. वैष्णवीला पुढील स्पर्धेसाठी संघटनेचे पदाधिकारी............ व क्रीडाप्रेमी गजानन पवार यांनी शुभेच्छा दिल्या.